सातबारा Watch

← हातखंबा

Ferfar #7909 · हातखंबा

रत्नागिरी, रत्नागिरी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
134/अ/2/अ/2, 134/अ/2/अ/3
Talathi
सौरभ मोहनराव जाधव
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026मौजे हातखंबा येथील स.नं. १३४ अ हि.नं. २/अ (एकूण क्षेत्र ०-४१-०० हे.आर) ही मिळकत श्री. रमेश धोंडू देसाई व श्री. उमेश धोंडू देसाई यांचे मालकीची असून, सदर संपूर्ण मिळकतीवर स्वामी स्वरुपानंद सहकारी पतसंस्था मर्या. रत्नागिरी जिल्हा यांचा रु. ७०,००,०००/- (अक्षरी रुपये सत्तर लाख फक्त) चा बोजा नोंद आहे. मा. उपविभागीय अधिकारी, रत्नागिरी यांच्या बिनशेती व विभाजन आदेशानुसार सदर मिळकतीचे एकूण ५ पोट हिस्से/प्लॉट पडलेले आहेत. स्वामी स्वरुपानंद सहकारी पतसंस्था मर्या. रत्नागिरी जिल्हा यांच्या जावक क्र. SSPM/RTHB./Loom/20/26-210 दिनांक ३१/१०/२०२६ च्या प्राप्त पत्रान्वये, पतसंस्थेने सदर कर्जप्रकरणासाठी केवळ प्लॉट क्र. १ 134/अ/2/अ/1(क्षेत्र १२२०.०० चौ.मी.) या क्षेत्रावरच पतसंस्थेचा रु. ७०,००,०००/- चा बोजा ठेवण्यास संमती दर्शविली आहे. त्याअनुषंगाने सदर कर्जाचा बोजा नवीन पडलेल्या इतर पोट हिश्यांवरून (प्लॉट क्र. २, प्लॉट क्र. ३ व इतर) कमी करून, फक्त स.नं. १३४अ / २/अ / प्लॉट क्र. १ (क्षेत्र १२२०.०० चौ.मी.) च्या ७/१२ वर पतसंस्थेचा रु. ७०,००,०००/- चा बोजा कायम ठेवण्यात येत आहे.व 134/अ/2/अ/2 व 134/अ/2/अ/3 वरील बोजा कमी करण्यात येत आहे.