सातबारा Watch

← कोचरी

Ferfar #990 · कोचरी

लांजा, रत्नागिरी · JSON

Type
आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
101, 114, 1175, 228, 230, 232, 253, 267, 393, 434, 440, 443, 600
Talathi
राधेश्याम भानुदास नागरे
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026बाजूस दाखल केलेली मिळकत सुधीर दत्ताराम गुरव व इतर 3 यांच्या नावे दाखल असून सदर मिळकत वडिलोपार्जित आहे.मूळ खातेदार तानू गोपाळ गुरव यांच्या नावे होते व ते मयत झाल्यावर फेरफार क्र. 1224 व वारस र.क्र. 6 नुसार मुलगा दत्ताराम तानू गुरव यांचे नाव 7/12 सदरी दाखल झाले.ते मयत झाल्यावर त्यांचे वारस म्हणून सुधीर दत्ताराम गुरव व इतर 3 यांचे नाव दाखल झाले. तरी तानू गोपाळ गुरव यांना दत्ताराम तानू गुरव यांचे व्यतिरिक्त बारकू उर्फ महादेव उर्फ तानू गुरव, शंकर तानू गुरव व निर्मला उर्फ बनाबाई रामचंद्र गुरव हे अन्य तीन अपत्य वारस होते. त्यांचे नाव 7/12 सदरी दाखल झालेले नाही त्यामुळे त्यांचे पश्चात त्यांच्या वारसांची नावे सुद्धा दाखल झालेली नाहीत. त्यामुळे कब्जेदार यांच्या नावाबरोबर सहहिस्सेदार म्हणून बारकू उर्फ महादेव उर्फ तानू गुरव हे दि.09/07/2021 रोजी मयत झाल्याने त्यांचे वारस म्हणून 1) प्रकाश बारकू गुरव 2) संगीता बारकू गुरव 3) सुलभा सदानंद गुरव 4) रविना रविंद्र गुरव, सुलोचना बारकू गुरव (मयत पत्नी-14/05/2022) तसेच 5) निर्मला रामचंद्र गुरव 6) शंकर तानू गुरव यांची नावे 7/12 सदरी दाखल होणेकामी प्रकाश बारकू गुरव यांचा वर्दी अर्ज आलेवरून, मा. कार्यकारी दंडाधिकारी लांजा यांचेकडील प्रतिज्ञापत्र क्र.सेतू/एस/आर10208 दिनांक 27/08/2026, बारकू तानू गुरव, महादेव तानू गुरव व खाडाखोड केलेले विष्णू तानू गुरव हे तिन्ही व्यक्ती एकच असलेबाबतचे तसेच निर्मला रामचंद्र गुरव व बनाबाई रामचंद्र गुरव या दोन्ही व्यक्ती एकच असलेबाबतचे प्रतिज्ञापत्र क्र.सेतू/एस/आर10264 दिनांक 31/08/2026 व सुधीर दत्ताराम गुरव यांनी मा. कार्यकारी दंडाधिकारी लांजा यांचेकडील संमतीपत्र क्र.सेतू/एस/आर10210 दिनांक 27/08/2026 पाहून नोंद केली.