Ferfar #839 · भटवाडी (चिंदर)
मालवण, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 691/2
- Talathi
- आकाश देविदास कऱ्हाळे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
आदेश क्रमांक : कुळवहिवाट अपिल क्र. 16/2025
आदेश दिनांक : 20/08/2025
आपिलार्थी उर्मिला उत्तम शेडगे यांनी केलेले अपिल क्र.16/2025 मंजूर करण्यात आले असून अपर तहसिलदार आणि शेतजमीन न्यायाधिकरण, मालवण यांनी गांव मौजे भटवाडी, ता. मालवण येथील केस नं. एलएसपी/चिंदर/भटवाडी एसआर ८६६ मध्ये दिनांक-२३/०३/२०१० रोजी दिलेला आदेश रद्द करण्यात आलेला आहे कुळवहिवाट /३२ग/आय.एन.क्यु.एस.आर./४४३०एल.एस.पी/चिंदर/मटवाडी/ एस.आर ८६६ चे कामी मे अप्पर तहसिलदार व शेतजमीन न्यायाधीकरण यांनी केवळ श्री मोहन सखाराम गोलतकर व जगन्नाथ दत्तात्रय लाड यांचे जबाबावरुन मुळ अर्जदार अंकुश विष्णु घुमडे यांना वाद मिळकतीची विक्री करण्याचा केलेला आदेश हा चुकीचा व बेकायदेशीर असल्याने रद्द करण्यात आला तसेच कनिष्ठ न्यायालयाने कुळवहिवाट दावा क्र.56/2005 दिनांक-29/04/2025 अन्वये अंकुश विष्णू घुमडे या व्यक्तिस कुळ म्हणून घोषित केलेले आहे. सदर आदेशाविरूध्द प्रस्तुत अलार्थीने उपविभागीय अधिकारी, कणकवली यांजकडे कुळवहिवाट अपील क्र. ०८/२०१० हे अपील दाखल केले आहे. सदर दाव्याचे कामी कनिष्ठ न्यायालयाचा कुळवहिवाट दावा क्र.५६/२००५ मधील आदेश रद्द करण्यात आलेला आहे गांव मौजे भटवाडी ता. मालवण येथील गट.नं.६९१ क्षेत्र ५-६७-० ख.०.२१.० पैकी ४.८३.० ख.०.१२.० ही प्रस्तुत प्रकरणी विवादीत मिळकत असून, सदर मिळकतीचे कुळकायदा कलम-३२म अंतर्गत विवादीत आदेशान्वये कनिष्ठ न्यायालयाने अंकुश विष्णू धुमडे यांस विक्री प्रमाणपत्र दिलेले रद्द करण्यात आलेले असून उपविभागीय अधिकारी (महसूल)कुडाळ यांच्या आदेशानुसार गट.नं.६९१ क्षेत्र ५-६७-० ख.०.२१.० पैकी ४.८३.० ख.०.१२.०( हे.आर.चौ.)सदर क्षेत्र मूळ कब्जेदार जगन्नाथ दत्तात्रय लाड यांचे नाव दाखल केले तसेच वरील आदेश व उपविभागीय अधिकारी कुडाळ यांचेकडील अपील क्र.१६/२०२५ बघून भूधारणा भोगवटादार- १ केली.