Ferfar #26980 · पारगांव
हातकणंगले, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार सूर्यप्रकाश सर्जेराव भांडवले हे असून यांनी कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटी लि,कोल्हापूर या संस्थेमधून कर्ज घेतले होते. ते त्यांनी न फेडल्यामुळे यांच्या ७/१२ वरती विशेष वसुली अधिकारी कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटी लि,कोल्हापूर यांचा महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१, १५६ व नियम १०७ (१०) अन्वये मालमत्तेच्या संबंधी विशेष वसुली अधिकारी कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटी लि,कोल्हापूर यांचा जा.क्र १०६४/२०२६ दिनांक २५/०५/२०२६ मे.सहकार न्यायालय क्र.१ कोल्हापूर/मे उपनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर शहर कोल्हापूर यांचेकडील वसुली प्रमाण पत्र क्र.१३४/२०२५ दिनांक 06/03/2026 चा जप्ती आदेश पाहून ७/१२ पत्रकी इतर हक्कात नोंद केली असे.