सातबारा Watch

← हरोली

Ferfar #5596 · हरोली

शिरोळ, कोल्हापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
484
Talathi
एकनाथ सदाशिव पाटील
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 जप्ती आदेश नोंद - बाजूस दाखल केले जमीनीबाबत कर्मवीर भाऊराव पाटील मल्टीस्टेट को-ऑप.क्रेडीट सोसायटी लि. जयसिंगपूर यांचे कडून सदाशिव आण्णाप्पा माळी यांनी कर्ज घेतलेले असून . सदर कर्जास आण्णाप्पा आप्पा माळी हे सहकर्जदार आहेत. सदर कर्ज थकबाकीत गेलेने त्यांच्यावर सदर कर्जाच्या वसुलीकरिता मल्टी-स्टेट को-ऑप, सोसायटीज अॅक्ट. २००२ च्या कलम ८४ अन्वये दावा दाखल केलेला असून सदर लवाद अर्ज नं. ०९/२०२५ दि. २४/०६/२०२५ ने वसुलीचा अॅवार्ड मिळाला असून सदर लवादी थकबाकीदार यांचेकडून र.रु. ७३०६९/- व दि. ०१/१०/२०२४ पासून पुढील होणारे व्याज व खर्चाची रक्कम येणे असलेने सहकर्जदार आण्णाप्पा आप्पा माळी यांचे परिशिष्टमध्ये नमूद क्षेत्रातील त्यांचे हिस्सेची मिळकती वर सदर संस्थेचा जप्ती आदेश नोंद करणेकामी (दि मल्टी-स्टेट को-ऑप, सोसायटीज अॅक्ट. २००२ च्या कलम ९७ व नियम २(x) प्रमाणे मे. सेन्ट्रल रजिस्ट्रार, सहकार मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांनी नियुक्त केलेले विक्री अधिकारी सागर देवाप्पा हुपरे - कर्मवीर भाऊराव पाटील मल्टीस्टेट को-ऑप.क्रेडीट सोसायटी लि. जयसिंगपूर वरील सक्षम अधिकाऱ्यास बहुराज्य सहकारी कायदा २००२ मधील नियम ३७(४/२) प्रमाणे स्थावर मिळकत जप्तीचा हुकुम आदेश जा. क्र. कर्मवीरमल्टीस्टेट / हेड / विक्री अधिकारी / जप्ती आदेश / २०२६-२७/२० दिनांक २३/०४/२०२६ ची प्रत वर्दीने आलेने ७/१२ इतर अधिकारात जप्ती आदेश नोंद करून सदर आदेशानंतर सदर मिळकत खाजगीरित्या तबदील करणेस व हस्तांतरण करणेस मनाई करणेबाबत नोंद करणेत आली.