सातबारा Watch

← भिलवडी

Ferfar #31388 · भिलवडी

पळुस, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-09-28
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
2341, 2539, 2540, 2541, 2618
Talathi
SOMESHWAR EKNATH JAYBHAYE
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/09/2026 मा. तहसीलदार, पलूस यांचे रस्ता केस प्रकरण क्र. रस्ता/143/EQJ/01/2024, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 चे कलम 143 अन्वये दिनांक 15/04/2026 रोजी पारित आदेशानुसार, मौजे भिलवडी, ता. पलूस, जि. सांगली येथील गट नं. 2341, 2618, 2541, 2540 व 2539 या जमिनींबाबत पक्षकारांमध्ये झालेल्या तडजोडीनाम्यास मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानुसार गट नं 2341 मधून गट नं. 2618 पर्यंत 10 फुट लांबीचा व 800 फुट रुंदीचा रस्ता असून या रस्त्यासाठी जे क्षेत्र गट 2341 मधून गेले आहे. त्याबदल्यात गट 2618 चे उत्तर बाजुपसून ते गट नं. 2539 च्या दक्षिण बाजुपर्यंत 19 फुट रुंद व 646 लांब असे एकूण 0.12 हे आर क्षेत्र उक्त नमूद गट नं. 2618, 2541, 2540 व 2539 मधून त्यांना देण्याचे आहे. असा आदेश आलेवरून संबंधित जमिनीमधून ये-जा करण्यासाठी निश्चित केलेल्या रस्त्याचा हक्क संबंधित सर्व जमिनींच्या 7/12 उताऱ्यांच्या “इतर हक्क” सदरी नोंदविण्याचे आदेशित केले आहे. त्यानुसार वरील सर्व गटांच्या 7/12 उताऱ्यांच्या “इतर हक्क” सदरी रस्त्याच्या ये-जा करण्याच्या हक्काची नोंद घेण्यात येत आहे.